HOME   व्हिडिओ न्यूज

तृप्ती देसाईंनी दिल्या जय शिवाजीच्या घोषणा!

विश्व विक्रमी ऐतिहासिक रांगोळीला दिली मान्यवरांनी भेट, शाळांसाठी २० तारीख


लातूर: अडीच एकर, एक लाख स्क्वेअर फूट, ५० हजार किलो रांगोळी आणि ४६ कलावंत!
लातुरच्या क्रीडा संकुलावर छत्रपतींच्या रांगोळीने इतिहास घडवला. गिनिज बुकातही येऊ घातलाय. या सुवर्णक्षणांचे हजारोजण साक्षीदार होण्यासाठी धडपडत होते. आज आघाडीच्या सामाजिक नेत्या तृप्ती देसाई, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातुरे, सीईओ विपीन इटनकर, डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, महापौर सुरेश पवार, उप महापौर देवीदास काळे, नानासाहेब जावळे पाटील, अरविंद पाटील यांच्यासह हजारोजणांनी रांगोळी पाहिली. उपक्रमाचे कौतुक केले. ही रांगोळी १९ तारखेपर्यंतच पाहता येणार होती पण लातुरातील शाळकरी मुलांनाही ती पाहता यावी यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एक दिवस वाढवला आहे. सगळ्या शाळांना २० फेब्रुवारी रोजी ही रांगोळी पाहता येईल.


Comments

Top