लातूर: १५ डिसेंबर जाऊन दोन महिने उलटले. खड्ड्यांचा वायदा पूर्ण झालाच नाही. आता तर कुणी या विषयावर बोलतही नाही. लातुरच्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी हा विषय मनावर घेतला आणि बाभळगाव मार्गावर आंदोलन केले. लातूर शहरात सर्वदूर खड्डे आहेत. ते अजुनही बुजवले गेले नाहीत. लातूर शहरातील विवेकानंद चौक ते बाभळगाव नाका या परिसरातील रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. या दुरावस्थेस कंटाळुन येथील सर्वपक्षीय युवकांनी अनोखे अंदोलन केले. या रस्त्यावरील खड्यात रांगोळी काढली त्यांना फुलांनी सजवले आणि या खड्यांची महापुजा ही केली. या रस्त्यावरती रोज एक तरी अपघात होतोय. आत्तापर्यंत या खड्यांमध्ये ५ ते ६ जण पडले आहेत. एकाचा मृत्युही झाला आहे. याचा निषेध म्हणून विवेकानंद चौक ते बाभळगाव नाका या परिसरातील नागरिकांनी या खडड्यांची यथोचित पुजा व महाआरती केली. ही वस्ती दलित असल्यामुळे मनपा प्रशासन जाणीवपुर्वक र्दुलक्ष करत आहे असा आरोप यावेळी राज क्षिरसागर यांनी केला. जर ०८ दिवसांत या रस्त्याचे काम नाही चालू झाले तर महापौर व पालकमंत्र्याच्या घरासमोर खड्डे पाडू असा इशारा यावेळी अंदोलनकर्त्यांनी दिला आहे. यावेळी शाम चव्हाण, राज क्षिरसागर, सुरेश चव्हाण, दत्ता मस्के, मोहण सुरवसे, बालाजी चौरे, छोटू मस्के, बळी गायकवाड, सचिंद्र कांबळे, दयानंद उपाडे, सुरज चव्हाण, रमेश उपाडे, हिरमण कांबळे, महादु साठे आदि उपस्थित होते.
Comments