HOME   व्हिडिओ न्यूज

सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला नगरसेवक गवळींचा वाढदिवस

रक्तदान, आरोग्य शिबीर, वृक्षारोपण, रस्त्याच्या कामाचा शुभारंभ


लातूर: लातूर महानगरपालिकेचे सदस्य शिवकुमार गवळी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्रभाग ११ मधील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. सर्व स्तरातील ४५० नागरिकांनी आरोग्याच्या विविध तपासण्या करुन घेतल्या. रक्तदान शिबिरालाही चांगला प्रतिसाद मिळाला. ५० जणांनी रक्तदान केलं. सामाजिक उपक्रमांसोबत प्रभागातील रस्त्याच्या कामाचाही शुभारंभ करण्यात आला. हे काम मनपाच्या माध्यमातून होत असून या रस्त्यासाठी साडेचार लाखांचा खर्च येणार आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनीही शिवकुमार गवळी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून या उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं असं शिवकुमार गवळी यांनी सांगितलं. यावेळी महापौर सुरेश पवार, उप महापौर देवीदास काळे, गुरुनाथ मगे, विशाल जाधव, रागिणी यादव आणि प्रभागातील नागरिक उपस्थित होते.


Comments

Top