HOME   व्हिडिओ न्यूज

जलयुक्त: कंत्राटदारांना ब्लॅक्लिस्ट करण्याचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना

जलयुक्तची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण व्हावीत यावर भर- जलसंधारण मंत्री शिंदे


जलयुक्त: कंत्राटदारांना ब्लॅक्लिस्ट करण्याचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना
लातूर: जलयुक्त अभियानातून महाराष्ट्रातील हजारो गावे जलपूर्ण झाली. या योजनेतील कामे नीटपणे व्हावीत यासाठी सरकार काळजी घेत आहे. एखादा कंत्राटदार योग्य रितीने कामे करीत नसेल तर त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचे अधिकार आम्ही जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत अशी माहिती जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रा. शिंदे आज औसा तालुक्यातील उजनी येथे जलयुक्तच्या कामांची पाहणी करण्यासाठी आणि पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी लातुरात आले होते. जलयुक्तची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी पुढाकार घेत आहोत. ही कामे अपेक्षेप्रमाणे व्हावीत यासाठी जिल्हाधिकार्‍यांना नोडल ऑफीसर म्हणून नेमले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामे सुरु आहेत. या कामांचा आढावा घेत असताना असे लक्षात आले की काही कंत्राटदार कामे घेतात, पण करीत नाहीत, अर्धवट सोडतात, दर्जेदार कामे करीत नाहीत. अशा कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्‍यांना दिला. एखाद्याचे काम अनियमित असेल ते, अपेक्षित दर्जाप्रमाणे होत नसतील तर अशा कंत्राट्दारांना काळ्या यादीत टाकण्याचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत अशी माहिती प्रा. शिंदे यांनी दिली.


Comments

Top