आजलातूर: आजलातूरने ०८ मार्च ते ०८ मार्च असा वर्षभर महिला दिन साजरा करण्याचं ठरवलं. विविध क्षेत्रातील महिला, तरुणी, विद्यार्थिनी यांच्यातील कर्तबगारी आम्ही समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या मालिकेत आशाताईंनी वर्षभरात खूप काहे चांगलं झालं, खूप काही वाईट झालं आणि बरचसं तिथंच राहिलं अशी प्रतिक्रिया दिली. स्वच्छतेच्या प्रश्नावरुन महिलांची कुचंबना होते यावर त्यांनी अधिक ल्क्ष केंद्रीत केलं. आम्ही सक्षम आहोत आणि आशावादीही आहोत असं त्या म्हणाल्या.
खूप नावाजलेल्या मोठ्या कुटुंबातील आशाताईंनी बॅंकेतील नोकरी सोडून सामाजिक कार्य सुरु केलं. त्या महिला आयोगाच्या सदस्याही होत्या.
Comments