लातूर: स्वच्छ लात्र सुंदर लातूर या संकल्पनेतून कचरा जागीच हिरवण्याची संकल्पना पुढे आली. स्वच्छ सर्वेक्षणात त्याला मूर्त रुपही मिळले. प्रभाग १८ चे नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांची सेंद्रीय खत निर्मिती, प्लास्टीकचा वापरातून रस्ता बांधणी, कचरा वर्गीकरण असे प्रयोग राबवले. पालकमंत्री संभाजी पाटील यांनी या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. अशा आदर्श उदाहरणासाठी पूर्वी पुण्याचे उदाहरण दिले जायचे. आता आम्ही लातुरचे नाव अभिमानाने घेऊ शकतो असे संभाजी पाटील म्हणाले. यावेळी महापौर, उप महापौर, नगरसेवक गुरुनाथ मगे, सरिता राजगिरे, भाग्यश्री शेळके, शैलेश लाहोटी उपस्थित होते.
Comments