लातूर: आज महामानव, भारतरत्न, घटनाकार, उपेक्षितांचे क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली. नांदेड मार्गावरील आंबेडकर चौकात भंते पैय्यानंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर वैशाली बुद्धविहारात सामुहिक बुद्धवंदना करण्यात आले. यानंतर हे भीमसैनिक आंबेडकर पार्ककडे रवाना झाले. याही ठिकाणी भंतेजींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सामुहिक वंदना केली. यावेळी भंतेजींनी शिक्षणात प्रगती करण्याचे आवाहन केले. शहरातील एक भाग शिक्षणात पुढे असतो आणि द्सरा भाग मागे असतो हा विरोधाभास नजरेस आणून दिला.
यावेळी केशव कांबळे, विनोद खटके, सचिन मस्के, चंद्रकांत चिकटे, प्रा. अनंत लांडगे, आतिश चिकटे, विजय बनसोडे, उत्तम कांबळे, अमोल इंगळे, सार्वजनिक जयंतीचे अध्यक्ष महेंद्र बनसोडे, खा. सुनील गायकवाड, आ. अमित देशमुख, विक्रम काळे, महापौर सुरेश पवार, पृथ्वीराज शिरसाट, धीरज देशमुख, मोईज शेख, डॉ. सुरेश वाघमारे, हनुमान जाकते, मकरंद सावे, प्रशांत पाटील, प्रवीण नाबदे, संजय ओहळ, लक्ष्मण कांबळे, गुरुनाथ मगे, पत्रकार महेंद्र जोंधळे, अरुण समुद्रे, नवनाथ आल्टे, अनिल गायकवाड, बबन भोसले यांच्यासह अनेक भीम सैनिक, बाबासाहेबांचे अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, बौद्ध उपासक, नागरिक उपस्थित होते.
Comments