लातूर: अनेक वर्षांपासून रखडलेल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी लातूर जिल्ह्यातील गृहरक्षक दलाच्या जवानांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सर्वोच्च न्यायालयाने ११/०३/२०१५ रोजी देण्यात आलेल्या निकालाप्रमाणे अमलबजावणी करावी तसेच महाराष्ट्रातील होमगार्डांचे प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबीत आहेत. प्रत्येकी ०३ वर्षांनंतर होमगार्डस यांच्या पुर्ण नोदणींचे प्रयोजन रद्द करावे. ३६५ दिवसांचे बंदोबस्त देण्याचे प्रयोजन निश्चित करण्यात यावे त्याच सोबत मानधन देण्याचा निर्णय घेण्यात यावा. होमगार्डस यांना कायद्यातील तरतुदीनुसार वेतन, भत्ते, शासनाच्या नियमांप्रमाणे देण्यात यावे. पोलीस प्रशासनातील रिक्त पदे शैक्षणिक पात्रतेच्या आणि अनुभवाच्या आधारे मानसेवी होमगार्डमधून भरुन घेऊन देशभक्तीचा आदर करावा. होमगार्डस समादेशक अधिकारी कार्यालयातील नियमीत लिपीक व शिपायांची नियुक्ती करण्यात याव्यात. होमगार्ड पथकनिहाय स्वतंत्र संगणकीकृत कार्यालये उभारण्यात यावीत. १२ वर्षांनंतर होमगार्डसच्या सेवा समाप्त करणारा निर्णय रद्द करण्यात यावा. वनरक्षक भरतीचे वय पोलीस भरती प्रमाणे करण्यात यावे. पोलीस भरतीचे आरक्षण ५% वरून २० ते २५ ट्क्के करण्यात यावे. होमगार्डसच्या सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यात यावे. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. यावेळी संतोष सुर्यवंशी, अमोल लांडगे, विजय चौधरी, जितेंद्र सातपोते, महेंद्र बनसोडे, अनिल गायकवाड, सरफराज पठाण, गणेश गायकवाड, दत्ता देशमुख, सुभाष होळकर, आनंद सुर्यवंशी उपस्थित होते.
Comments