लातूर: महात्मा बस्वेश्वर यांच्या ९१३ व्या जयंती निमित्त लातूर शहरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये प्रामुख्याने भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली बस्वेश्वर कॉलेज येथून सुरू होऊन गंजगोलाई, गांधी चौक, शिवाजी चौक, राजीव गांधी चौक ते बस्वेश्वर चौकात या रॅलीची समाप्ती झाली. या रॅलीमध्ये तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांसाठी बस्वेश्वर चौक येथे नाश्ता व थंड पिण्याच्या पाण्याची सोय सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आली होती. याचप्रमाणे विविध ठिकाणांहून सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहेत असे बालाजी पिंपळे यांनी सांगितले. यावेळी बबलू अंकलकोटे, अभिजीत मुनाळे, नितीन हसाळे, क्रुष्णा खानापुरे, शिवराज मुळावकर,राहुल रोडे, यांच्यासह हजारो बसवप्रेमी बांधव उपस्थित होते.
Comments