HOME   व्हिडिओ न्यूज

रावसाहेब दानवेंच्या प्रतिमेला चपलांचा प्रसाद

राष्ट्रवादीने केले आंदोलन, दानवेंना घालणार लातूर बंदी, आंदोलन तीव्र करणार


लातूर: पैठणच्या शेवगाव तालुक्यातील शेतकर्‍यांच्या आंदोलनावेळी झालेल्या गोळीबारात दोन शेतकरी जखमी झाले होते. एका शेतकर्‍याच्या छातीला गोळी लागली होती. याबाबत बोलताना पायावर गोळ्या घालता आल्या असत्या असे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले होते. याचा अर्थ शेतकर्‍यांना गोळ्या घालण्याची परवानगीच देत आहेत. याचा लातूर राष्ट्रवादीने निषेध केला आहे. आज दुपारी लातूर राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते शिवाजी चौकात जमा झाले. त्यांनी दानवे यांच्या प्रतिमेला जोडे मारले.
छातीवर गोळ्या झाडण्याऐवजी पायावर घालायच्या होत्या, याचा अर्थ शेतकर्‍यांना गोळ्या घालण्याला परवानगी देणंच आहे, यांना गोळ्या घालता येत असतील तर इतरांनाही घालता येतात, लोक दगडही घालू शकतात, दानवेंनी असली विधानं करु नयेत अन्यथा त्यांचं लातूरमध्ये येणं बंद करु, यापेक्षाही तीव्र आंदोलन करु असा इशारा शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे दिला. दानवेंच्या या वक्तव्याने शेतकर्‍यांच्या भावना दुखावल्या, ते शेतकर्‍यांना सालेही म्हणाले होते, बोलल्याप्रमाणे कर्जमाफी करीत नाहीत सगळे मंत्री वात्रट बोलतात असा आरोप बाबासाहेब पाटील यांनी केला. दानवे यांनी शेतकर्‍यांबाबत अपशब्द वापरले, पायावर गोळ्या घातल्या पाहिजेत असं ते म्हणाले, दानवेही शेतकर्‍याचे वारस आहेत, बापाच्या पायावर गोळ्या घालण्याची भाषा ते वापरतात असे सांगून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण नाबदे यांनी निषेध केला. यावेळी पप्पू कुलकर्णी, श्रीकांत सूर्यवंशी, संजय बनसोडे, चंदन पाटील नागराळकर, बबन भोसले, गणेश भोईबार, भाग्यश्री क्षिरसागर, रेखा कदम, मिनाक्षी शिंदे, शहूताई कांबळे, सुवर्णा महाजन, अनुसया भालेकर, आशिष वाघमारे उपस्थित होते.


Comments

Top