लातूर: लातूर शहरात कचर्य़ाचा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे. कुठल्याही संस्थेला काम द्या, भलेही परदेशी कंपनीला काम दिले तरी या शहराच्या कचर्याच्या समस्या मार्गी लागेल असे वाटत नाही. कचरा व्यवस्थापन करणार्या संस्थेकडून काहीही दावे येऊ द्या लातुरकरांच्या समस्या जशास तशा आहेत. शहराच्या एका बाजुला आदर्शवत काम चालते पण दुसरीकडे याच कामाची वाट लागते. कचरा व्यवस्थापनाची वाट लागलेल्या भागांवर लक्ष केंद्रीत करुन तिथले प्रश्न समोर आणण्याचा उपक्रम आज्लातूर.कॉमने सुरु केला आहे. त्याच्या पहिल्या भागाचे उदघाटन विक्रांत गोजमगुंडे यांनी केले. आजलातूर कार्यालयात येऊन त्यांनी ‘कचरा महोत्सवा’चा पहिला भागही पाहिला.
Comments