लातूर: लातूर शहरातील मुख्य आणि वैशिष्ट्यपूर्ण बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईत सार्वजनिक शौचालय उभारण्याचे काम काम सुरु झाले आहे. त्यासाठी दोन मोठे खड्डे घेण्यात आले आहेत. त्याला या भागातील व्यापार्यांनी विरोध केला आहे. एकदम ब्रिजवासी हॉटेलसमोर भर फुटपाथच्या पुढे आणि मागे हे दोन खड्डे आहेत. याच्या विरोधात व्यापार्यांनी महानगरपालिकेच्या आयुक्ताला निवेदन सादर केले आहे.
मनपाने घेतलेले हे खड्डे १४ मेच्या पहाटे तीन वाजता घेतले. प्रस्तावित शौचालयाच्या मागे काही अंतरावर मशीद तर पुढे काही अंतरावर जगदंबेचं मंदीर आहे. भर बाजारातल्या या शौचालयाचा परिणाम व्यापारावर होईल, भावना दुखावण्याचे प्रसंगही ओढवतील असे या व्यापार्यांना वाटते. सामाजिक कार्यकर्ते मोहसीन खान यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना भेटलेल्या या शिष्टमंडळात हमीद खान, मौलाना उवेस कासमी, अफजल लोखंडवाला, अब्दुल सलाम, शेख रियाज, शेख शादूल, असिफ बागवान, लहू चव्हाण, पवन पवळे, व्यंकट कोंबडे, बागवान फय्याजोद्दीन, बागवान युसूफ, अस्लम बागवान, उमेर बागवान, खालेद बागवान, मैनुद्दीन बागवान, मेहताब बागवान, कलीम शेख, मुबारक पठाण, निवृत्ती राऊत, सईद चांदसाब, विमल सूर्यकर, सुनिता शिंदे यांचा समावेश होता.
Comments