लातूर: आज लातूर जिल्हा पत्रकार संघाच्या निवडणुकीसाठी पत्रकार संघाच्या कार्यालयात, धर्मादाय आयुक्तांच्या यंत्रणेत आणि देखरेखीखाली मतदान झाले. ५११ मतदार असलेल्या या संघाची मागची निवडणूक भोंगळ कारभारामुळे रद्दबातल ठरली होती. त्यानंतर धर्मादाय आयुक्तांना लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार हा कार्यक्रम लागला. अध्यक्ष आणि सरचिटणीस पदासाठी निवडणूक लागली. अध्यक्षपदासाठी नरसिंह घोणे आणि अमोल शिंदे आणि सरचिटणीसपदासाठी शशिकांत पाटील, सचिन मिटकरी यांची उमेदवारी कायम राहिली. त्यासाठीच आज मतदान झाले. खा. सुनील गायकवाड स्वत: संपादक-पत्रकार आहेत. त्यांनीही मतदानाचा हक्क नियमाने बजावला. बराच काळ रांगेत तिष्ठत उभे राहिले. प्रस्तुत यंत्रणा आणि नियमांचे पालन त्यांनी केले.
Comments