लातूर: महान योध्दा, इंग्रजांवर वचक ठेवणारा शासक टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त आज एमआयएम (अली) पक्षाने मोटारसायकल रॅली काढली. या रॅलीत अनेक तरुणांनी भाग घेतला होता. अनसार नगर, ताजोद्दीन बाबा नगर येथून हे तरुण गरुड चौकात जमा झाले. विवेकानंद चौक, शाहू चौक, गंजगोलाई, शिवाजी चौक, रेणापूर नाका, पुन्हा शिवाजी चौक ते टाऊन हॉल मैदान अशी ही रॅली निघाली. यात पक्षाध्यक्ष अॅड मोहम्मद अली शेख, मौलाना अफरोझ साहेब, मौलाना सय्यद फसिउद्दीन, पठाण यासिन, तांबोळी निसार अहमद, शेख अख्तर मामू, सय्यद रहीम, सय्यद मेहबूब, सय्यद रफिक, शेख ताहेर, पठाण सलमान, पठाण तालेब, शेख सरफराज, शेख सोहेल, अहमद खान पठाण, करीम खान पठाण, सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष शेख ताहेरभाई, शेख समद समद साहेब, इस्माईल फुलारी, शेख युसूफ, शेख खैय्युम, अड मुश्ताक सौदागर, शेख जावेद, व अन्य हजारोच्या संख्येने एमआयएम अली पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅलीच्या सुरुवातीला डीवायएसपी शिलवंत ढवळे यांचा सत्कार करण्यात आला.
आज हिंदुत्ववादी राजकीय नेते शहिदांना नावे ठेवत आहेत. खर्या शहिदांचा इतिहास नव्या पिढीला कळावा, त्यातून प्रेरणा मिळावी हा या रॅलीमागचा उद्देश आहे. आजचे राजकीय नेते देशभक्तांचा अवमान करीत आहेत. त्यांना खोटे ठरवत आहेत. यामुळे हा सामाजिक उपक्रम दरवर्षी आयोजित केला जातो असे एमआयएम अली पक्षाचे प्रमुख अॅड मोहम्मद अली शेख यांनी सांगितले.
Comments