लातूर: रात्री अन दिवसाही माणसाचा जीव वाढत्या तापमानामुळे तगमगतो आहे. शहरात मध्यवर्ती ठिकाणी एकमेव आंबेडकर पार्क नावाचे उद्यान आहे, जिथे उन्हाच्या काहिलीपासून स्वत:ला वाचवत आराम करता येतो, विश्रांती घेता येते. पण इथेही सावलीचा अभाव आहे. मागच्या वर्षी या बागेतली मोठमोठाली वाळलेली दहा पंधरा झाडे तोडण्यात आली पण त्या ठिकाणी नवी झाडे लावण्यात आली नाहीत. बाजुलाच लातूर वृक्षचा उपक्रम सुमारे वर्षभर चालला पण त्यांनाही दया आली नाही, महापालिकेचे तर समोर लक्षच नसते. फक्त बाजुच्या मैदानाचे भाडे वसूल करण्यात मनपाला रस असतो. वेगवेगळ्या कामांसाठी शहरात आलेली माणसं या बागेत सावलीचा शोध घेत असतात. नाना नानी, आजोबा आजी पार्कमध्ये आराम करता येत नाही, तशी सोय नाही. शिवाय ही बाग दिवसभर बंद आहे. आरामासाठी त्याचा उपयोग होत नाही.
Comments