लातूर: गुंठेवारीच्या प्रश्नावर बोलावलेली महानगरपालिकेचे विशेष सभा महापौरांनी पाच मिनिटात गुंडाळली. याचे पडसाद उमटले. विरोधक कॉंग्रेसच्या मंडळींनी बराच गोंधळ केला पण काहीच झाले नाही. अखेर निषेध व्यक्त करण्यासाठी नामी युक्ती शोधण्यात आली. महापौरांना गाजरं भेट देण्याचं ठरलं. वरच्या पानांसह पुष्पगुच्छासारखी वेष्टण लावलेली गाजरे महापौरांच्या दालनात आली. दीपक सूळ, कैलास कांबळे, युनूस मोमीन, सचिन बंडापल्ले, गौरव काथवटे रवीशंकर जाधव यांनी ती महापौरांना बळेबळे भेट देण्यात आली. महापौरांनी हाती घेतल्यानंतर त्यावरचं वेष्टण काढण्यात आलं तेव्हा गाजरं उघडी पडली. गाजर घ्या गाजर अशी आरोळी एका नगरसेवकानं ठोकली. विशेष सभा घेतल्याबद्दल तात्यांचं अभिनंदन असं युनूस मोमीन म्हणाले. आता बिल्डर लॉबी येणार, तात्यांची आर्थिक तरतूद होणार, सगळ्यांचं कल्याण होणार अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते दीपक सूळ यांनी दिली. महापालिकेच्या आजवर पाच सहा सर्वसाधारण सभा झाल्या. महापौर सतत लोकांची दिशाभूल करीत असतात म्हणून हे आंदोलन केलं असं युनूस मोमीन म्हणाले.
Comments