लातूर: लातूर-मुंबई ही लातुरकरांची हक्काची रेल्वे बिदरकरांनी पळवून नेली त्याला नऊ महिने होत आहेत. आज एका बैठकीच्या निमित्ताने खासदार सुनील गायकवाड यांची भेट झाली. रेल्वेचा विषय छेडला. लातुरकरांनी लातूर-मुंबई गाडीची प्रतिक्षा करावी की आशा सोडून द्यावी असा प्रश्न त्यांना केला असता, लातूर-मुंबई ही लातुरची रेल्वे आहे. मी लातुरचा खासदार आहे. त्यामुळे रेल्वेमंत्री, संबंधित विभागाचे जनरल मॅनेजर यांच्याशी मी सतत संपर्कात असतो. ही रेल्वे लातुरला आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. या रेल्वेबाबत पंतप्रधान, रेल्वेमंत्री आणि नितीन गडकरी यांच्याकडे वारंवार विनंती केली आहे. लातुरला जरी नवीन रेल्वे आल्या असल्या तरी लातूर-मुंबई पूर्ववत सुरु व्हावी यासाठी पाठपुरावा सुरु आहे. ही रेल्वे आणणारच असं खासदार म्हणाले. या नऊ महिन्यात आपण काही प्रयत्न करीत नाही असं लातुरकरांना वाटतं त्यामुळे ते नाराज आहेत याची आठवण करुन दिली असता, मी काय काय करतो याची प्रत्येक वेळी बातमी काढण्याची गरज नाही. या रेल्वेसाठी शेवटचा प्रयत्न म्हणून पंतप्रधानांची भेट घेणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.
Comments