काही महिन्यांपूर्वी लतुरच्या अशोक हॉटेल चौकाचे नाव बदलण्यात आले. संकुलात जाण्याचा रस्ता बंद करुन त्या ठिकाणी विश्रामासाठी सिमेंटचे बाक बसवण्यात आले. समारंभपूर्वक या ठिकाणी लोकमान्य टिळक चौक असे नामरण करण्यात आले. तेथे मोठा फलकही बसवण्यात आला. या फलकावर स्टीलची अक्षरे लावण्यात आली. या अक्षरांतील एक अक्षर सतत गळून पडत असते. खाले पडलेले हे स्टीलचे अक्षर कुठे गायब होते माहित नाही. मग कधीतरी एखादा कार्यकर्ता जागा होतो आणि पुन्हा पाटी नीट केली जाते. आता या पाटीवरील मा अक्षर गायब झाले आहे. मान ठेवता येत नसेल तर ठीक पण अवमान तरी करु नये अशी अपेक्षा केली जात आहे.
Comments