लातुरच्या कचरा व्यवस्थापनाचं काम नव्या एजन्सीला दिल्यापासून रस्त्यावर अधिकच कचरा दिसू लागला आहे. ठराविक ठिकाणी कचरा अधिक आढळतो. या ठिकाणी मोबाईल कचरा पेट्या ठेवता येतील. खरा किस्सा आहे खोरी गल्लीचा. या गल्लीत मांसाहार देणारी अनेक हॉटेल्स आहेत. त्यातच परवा कुठलातरी दरबारही सुरु झालाय. त्याच्याजवळचं हे छायाचित्र. या ठिकाणी दररोज सकाळी असा कचरा साचत असतो. या कचर्यात मांसाहारी हॉटेलातील खरकटी, उष्टी हमखास आढळतात. यामुळे या भागातल्या मोकाट कुत्र्यांना सकाळी सकाळी उत्तम नाश्ता मिळतो. दुपारी बारा-एक वाजता घंटागाडी येते आणि हा कचरा घेऊन जाते. या कचर्याचं वर्गीकरण केल्यास काल गिर्हाईकांनी काय काय ऑर्डरी दिल्या असतील याची चांगली कल्पना येते!
Comments