ही आहे जुन्या लातुरातील गोरक्षणची ऐतिहासिक विशाल विहीर. ७२ च्या दुष्काळात याच विहिरीने लातुरकरांची गरज पूर्ण केली. या विहीरीत गणपती विसर्जित करण्याची प्रथा असल्याने प्रचंड गाळ तयार झाला होता, सुकाणू समितीचे समन्वयक रवींद्र जगताप, काही नगरसेवक यांनी प्रयत्न केल्यामुळे १५० टन गाळ काढण्यात आला. १०५ फुटाच्या या विहिरीने भरभरुन पाणी दिले. १६ -१७ च्या उन्हाळ्यात या विहिरीने हवे त्याला पाणी दिले. आता टंचाई संपली, दूर्लक्ष झाले. संबंधितांनी या विहिरीवरचा पंप काढून नेला आणि वीज कनेक्शनही तोडले! आता विहीर उशाशी असूनही गोरक्षणच्या रहिवाशांना पाणी मिळत नाही.
Comments