लातूर शहराच्या पाणी पुराठ्याला जणू शाप लागलाय. वाघमारे सरांच्या काळात पंधरा दिवसाला पाणी यायचे. दोन वर्षापूर्वी चक्क २२ दिवसांना आले. आता मुबलक साठा असताना आठवड्याला कसेबसे मिळते. पाणी आहे पण तुरटी नाही म्हणून मागे पुरवठा बंद थांबला होता. परवा ब्लिचिंग नव्हते म्हणून पाणी वेळेत आले नाही. मागच्या आठवड्यात लातुरकरांना लाल रंगाचे पाणी मिळाले. आज पिवळे पाणी आले. पुढे कसे येईल याचा पत्ता नाही. कारण अजूनही मनपाकडे ब्लिचिंग पावडर नाही. पुरवठादाराचा कालावधी संपला आहे. बाजारात पत नाही, उधार कुणी देत नाही. उस्मानाबाद आणि सोलापुरला भीक मागून काही प्रमाणात ब्लिचिंग आणले. तेवढ्यावरही भागले नाही. अच्छे दिन ना का येईनात. आता तर अच्छा पाणीही मिळत नाही.......
Comments