लातुरच्या कचरा महोत्सवात आपलं स्वागत.
लातूर जिल्हा बॅंकेच्या मागे मोकाट जनावरांसाठी उभारलेला कोंडवाडा आहे. इथं जनावरे नसतात. ती रस्त्यावर कचर्यात अन्न शोधत असतात. याच कोंडवाड्यामागे कचरा मोठ्या वाहनात भरण्याची व्यवस्था केली आहे. कचर्यातील प्लास्टीक बाजुला काढून ते पोत्यांत भरुन या कोंडवाड्यात साचवले जातात. असा भरपूर प्लास्टीक कचरा मोठ्या प्रमाणावर जमल्यानंतर कुणीतरी रात्री पेटवून देतं. पुन्हा प्लास्टीक जमवणं सुरु होतं. आम्ही कचर्याचे वर्गीकरण करतो, प्लास्टीक बाजुला काढतो, तो जमवून प्रक्रियेसाठी पुढे देतो असा दावा संबंधित कचरा व्यवस्थापन संस्था करते!
Comments