हे आहे लातुरचं ऐतिहासिक टाऊन हॉल मैदान. या मैदानावर दरवर्षी पावसाळ्यात अशा पद्धतीनं पाणी साचतं. मैदानाची नासाडी होते. चार महिने ते कुणाच्याही कामाला येत नाही. या मैदानावर एवढे पाणी साचत असेल तर त्याचा उतार काढून एखाद्या कोपर्यात शोषखड्डा घ्यायला हवा. जेणेकरुन मैदानावर पाणी जमणार नाही, पडणारे पाणी शोषखड्ड्यात जाऊन पुनर्भरण होईल. सगळेजण हे मैदान बघतात पण कुणीच त्यावर उपाय करीत नाही. इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानवाल्यांनाही हे सुचलं नाही. अजून वेळ गेलेली नाही. हा प्रयोग करता येईल. मैदानही नीट राहील आणि जलपुनर्भरणही होईल.
Comments