HOME   फोटो फिचर

कुणाला मदत, कुणाला आधार? कसलं पोलिस केंद्र?......

कुणाला मदत, कुणाला आधार? कसलं पोलिस केंद्र?......

लातूरला नवी रेल्वे आल्यानंतर सिग्नल कॅंपचा जुना रेल्वेमार्ग राज्य सरकारच्या ताब्यात गेला. या जुन्या मार्गाच्या बाजुला मोठी वस्ती होती. ती हटवण्यात आली. हे प्रकरण न्यायालयात गेलं. अजूनही ते प्रलंबित आहे. अशा न्याप्रविष्ट प्रकरणातील जागेवर काहीच करता येत नाही असा नियम असतानाही कायदे सांगणार्‍या पोलिसांनी विवेकानंद रुग्णालयाच्या अलीकडे वादग्रस्त जागेवर पोलिस मदत केंद्र उभारले. त्यातून आजवर कितीजणांना मदत झाली ते माहित नाही. पण मदत मागायला गेलेल्याला या चौकीचे कुलूप पाहून परतावे लागते. अनंत काळापासून ही चौकी उघडली नाही. तिच्या दाराला लावलेले कुलूप गंजत आले आहे!

Comments

Top