लातूर शहर सुशोभिकरणाच्या मोहिमेत शहरातील सर्व रस्ते दुभाजक सजवण्यात आले. त्यांना सुशोभित करण्यासाठी वेगवेगळ्या व्यावसायिकांना देण्यात आले. पण काही दुभाजकात अट्टाहासाने पाम वृक्षे लावण्यात आली. बहुतांश पामची दुरावस्था झाली आहे. पण बार्शी मार्गावर काही ठिकाणी सदाबहार कन्हेरीची झाडे लावण्यात आली. ती उत्तम आली आहेत. बहुतांश झाडांना उत्तम फुलेही आली आहेत. हाच पॅटर्न सगळीकडे राबवला गेला असता तर खर्या अर्थाने सगळे दुभाजक छान सजले असते.
Comments