शेततळ्यांसाठी अर्ज करा, अनुदान मिळवा, खोदकामासाठी माणसं शोधा असली भानगड लातुरात नाही. जगोजागी मोठमोठे खड्डे असल्याने पाऊस पडला की ते लगेच भरतात. आपण पाहता आहेत ते दृश्य गांधी चौकातील एलबीटी कार्यालयाजवळचं आहे. हे कार्यालय तसे पडूनच आहे. ते पाडून त्या ठिकाणी भाजीपाला लावावा, त्याला या शेततळ्यातील पाणी द्यावं म्हणजे मनपाला उत्पन्नाचे आणखी एक साधन मिळेल. त्याला जीएसटीही लागणार नाही.
Comments