HOME   फोटो फिचर

उकंड्याचे पांग फिटले....

उकंड्याचे पांग फिटले....

लातूर शहरात अनेक उकिरडे आहेत. काही कचर्‍यांचे आणि काही रस्त्यांचेही उकिरडे झाले आहेत. पेव्हर ब्लॉक टाकून गुळ मार्केट चौकाचाही असाच उकिरडा झाला होता. या चौकातून गेल्यावर किंवा आल्यावर आपल्या शरिरात हाडे आहेत याची जाणीव व्हायची. एखादी गोष्ट दुरुस्त होत नसेल, त्याचे भले होत नसेल, त्याकडे दूर्लक्ष होत असेल आणि त्याचे कल्याण झाले तर उकंड्याचे पांग फिटले असं म्हणायची पद्धत आहे. तसंच या चौकाचं झालं. परवा मनपाने हा चौक दुरुस्त केला. सवय होईपर्यंत हाच को तो गुळ मार्केट चौक असा प्रश्न वाहन लकांना नक्कीच पडणार आहे.

Comments

Top