लातूरची जिल्हा बॅंक ते महानगरपालिकेच्या कार्यालयादरम्यान असलेल्या रस्त्यावर बॅंकेच्या बाजुने दोन झरे फुटले होते. मुख्य पाणी पुरवठा लाईन फुटल्याने चार पाच महिन्यापासून अहोरात्र या झर्यातून पाणी वाहत होते. हे झरे आजलातूरने दाखवल्यानंतर मनपाने त्याची दखल घेतली. आज झर्याच्या ठिकाणी खोदकाम सुरु करण्यात आले. तीन चार फुटांवर मुख्य पाईपलाईन फुटलेली दिसली. ही पाईपलाईन किमान ५० वर्षे जुनी आहे. बर्यापैकी सडली आहे. आता ती दुरुस्त केली जात आहे.
Comments