नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथे दरवर्षी खंडोबाची यात्रा भरते. या यात्रेत पाळीव प्राण्यांची खरेदी-विक्रीही होते. तसेच प्राण्यांचे शोही आयोजित केले जातात. बाभळगावच्या देशमुख कुटुंबियांनी प्रेमाने सांभाळलेली घोडी दामिनी हीसुद्धा या शोमध्ये सामील झाली. तिला प्रेक्षकांनी दाद दिली. तिच्या गटात ती प्रथम आली. दामिनीला या शोमध्ये युवा नेते, जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख यांनी स्वत: सादर केले.
Comments