कसलाही बहाद्दर पोलिस अधिकारी आला तरी लातुरला मटका नावाचा जुगार बंद होत नाही. हे सर्वश्रुत आहे. तरीही काही संघटना अधून मधून आंदोलने करीत असतात. असंच आंदोलन मनसेनं केलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा देत मटके (मडकी) फोडली. मडकी फुटण्याचा आवाज संबंधित अधिकार्यांच्या नक्कीच गेला नसेल पण मटका चालवणार्याच्या कानावर ताबडतोब गेला असेल हे मात्र नक्की.
Comments