मित्रांनो हे दृश्य आहे सुभाष चौकातलं. शहरातला मान्यवर चौक. या चौकातली मुतारी हटवण्यात आली. त्याची जागा कचर्याने घेतली. कुण्या बहाद्दराने कचरा जमवण्यासाठी येथे चक्क पाचशे लिटर पाण्याची टाकीच आणून ठेवली. या टाकीतूनही कचरा ओसंडून वाहत असायचा. आता तर ही टाकीच पालथी टाकण्यात आली आहे. कचरा आता रस्त्यावर विसावला आहे. वारे आले की तो फरार होत असतो!
Comments