पेट्रोलचे भाव जसजसे वाढू लागले तसतशा इलेक्ट्रीक बाईक्सच्या चौकशा सुरु झाल्या. कंपन्याही पुढे आल्या. सरकारचे धोरणही इलेक्ट्रीक बाईकच्या बाजुचे आहे. लातूर शहरात काही वर्षांपूर्वी अशा बाईक्स-स्कूटर आल्या होत्या. पण त्यातील त्रुटींमुळे हे प्रस्थ फार काळ चाललं नाही. अनेकांनी त्या भंगारमध्ये काढून टाकल्या. आता आलेल्या नव्या कंपन्यांनी जुने दोष बाजुला सारत नवं तंत्रज्ञान आणलं. या बाईकमधला सर्वात खर्चिक भाग म्हणजे यासाठी वापरल्या जाणार्या बॅटरीज. आता नव्या तंत्राच्या बॅटरीज आल्याने या बाईक कस्टमर फ्रेंडली बनल्या आहेत. शहरात पाच ठिकाणी या बाईक्सच्या शोरुम आहेत. दोन वर्षांपूर्वीच इलेक्ट्रीक रिक्षा आल्या. लातुरात बोटावर मोजण्याइतक्या दिसतात. पण त्या वापरणारे खूश आहेत. पण रिक्षांचा फारसा प्रसार झाला नाही. आता लोकांना प्रतिक्षा आहे ती विजेवर चालणार्या मोटारसायकलींची!
Comments