सतत घाण केल्या जाणार्या जागा स्वच्छ करुन त्या ठिकाणी वाचन कट्टे सुरु करण्याची चळवळ लातुरात सुरु झाली. पोस्टासमोर, दयाराम रोड, हत्तेनगर अशा अनेक भागात हे कट्टे सौंदर्य तर निर्माण करतातच. अनेकांना विरंगुळा देतात शिवाय त्या ठिकाणी कचरा टाकला जात नाही, घाण केली जात नाही. असंच एक ठिकाण आहे खोरी गल्ली. या ठिकाणी बाजुच्या अनेक हॉटेलातील ओला आणि सुका कचरा टाकला जायचा. भर रस्त्यावर मोठी घाण झाल्याने कुत्री जमायची, दुर्गंधी सुटायची. रस्त्याचे विद्रुपीकरणही व्हायचे. या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी वाचन कट्टा तयार करण्यात आला. मनपाने सिमेंटची दोन बाकेही बसवली. या बाकांची अवस्था पहा. कुणीतरी ही दोन्ही बाके गटारीत टाकून दिली आहेत. आता हळूहळू या जागा कचरा जमा होणार!
Comments