काही दिवसांपूर्वी लातूर शहरातील वाहतूक यंत्रणा सुरळीत करण्याचा झटका मनपा आणि वाहतूक नियंत्रक पोलिसांना आला. त्यांनी बारीक सारीक उपाय योजना केली. पण त्याचा उपयोग झाला नाही. शहरातील प्रमुख शिवाजी चौकातील डेपोसमोर पुलाच्या खाली बॅरीकेट्स लावण्यात आले. हे बॅरिकेट्स कधीच जागेवर नसतात. येणारे जाणारे सोयीने त्याला हटवत असतात. बाजुलाच पोलिस असतात. पण त्याकडं ते लक्ष देत नाहीत. कदाचित हा भाग त्यांच्या हद्दीत येत नसावा!
Comments