HOME   फोटो फिचर

रुग्णालयांच्या दारांवर बंदचे फलक! समुपदेशन विभाग का नाही?

रुग्णालयांच्या दारांवर बंदचे फलक! समुपदेशन विभाग का नाही?

कोलकात्यात डॉक्टरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज राज्यभर डॉक्टरांनी बंद पाळला. हा बंद २४ तासांचा आहे. पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांच्या दवाखान्याबाहेर, रुग्णालयाबाहेर बंद असल्याच्या पाट्या झळकल्या. देशभर सातत्याने कुठे ना कुठे डॉक्टरांना मारहाण केली जाते. आम्ही डॉक्टर आहोत, देव नाहीत असं सांगण्याचा प्रयत्न ही मंडळी करीत असते. पण दाखल रुग्ण दगावल्यानंतर डॉक्टरांवर सहजपणे हलगर्जीपणाचा आरोप केला जातो, तो काही ठिकाणी खराही असतो. अशा प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी रुग्णालयातून समुपदेशन कक्ष उभारण्याची गरज आहे.

Comments

Top