उन्हाळ्यात लातुरकर गाड्या लावण्यासाठी मिळेल त्या सावलीत गाडी घुसवत असतात. असंच एक सावली देणारं कोर्टाच्या कोपर्यावरलं आपट्याचं झाड आजच्या वार्यात कोसळलं. या झाडाखाली टपरी चालायची. कुणीतरी एकजण टेबल खुर्ची मांडून शिक्के मारीत बसलेला असायचा. कोर्टातल्या कामाला वेळ असला की अनेकजण या सावलीत प्रतिक्षा करीत थांबायचे. आता ही सावली गेली आहे.
Comments