लातुरला पाणी पुरवठा करणार्या धरणात जेमतेम दोन महिने पुरेल एवढेच पाणी शिल्लक आहे.....ताजी बातमी.
लातुरच्या सावेवाडीतील त्रिमुर्तीनगरात फक्त १४ घरांना मागच्या साडेचार महिन्यांपासून पाणी येत नाही. सगळे प्रयत्न करुन झाले. परवा पत्रकार रवींद्र जगताप यांनी आमदारासमोर एका कारभार्याचे नाक दाबले की लगेच आज १४ फुटांची पाईपलाईन टाकून या भागातील पाणी पुरवठा सक्षम करण्यात आला. आधीचे साडेचार महिने या १४ कुटुंबांनी जो वनवास भोगला त्याला जबाबदार कोण? अमृत की अमृतमंथन करायला लावणारे? धरणातलं पाणी संपत आलंय अन आता पाईपलाईन झाली. पाणी संण्पल्यावर त्यातून काय सोडणार आहात? असा प्रश्न केला जात आहे!
Comments