कोणती गोष्ट कुठं वापरावी यालाही एक तारतम्य लागतं. निवडणुकीतले फ्लेक्स ग्रामीण भागात कडबा, सोयाबीन इतर पिकांच्या गंजी झाकण्यासाठी वापरले जातात. आश्वासन पूर्ण होईल नाही तर होणार नाही. आलेलं पीक झाकण्याची सोय झाली तरी पुष्कळ! आपल्या मार्केट यार्डाच्या मागील गल्लीत वृक्षारोपण करण्यात आले आहे. या लहान झाडांना लाकडी काठ्या लावण्यात आल्या आहेत. त्यालाही झाकण्यात आलं आहे. भाजपच्या कमळाचं फ्लेक्स त्याला गुंडाळण्यात आलंय! कमळाच्या भितीनं झाडाला कुणी हात लावणार नाही अशी धारणा असावी किंवा, कमळाच्या संरक्षणात झाड चांगले येईल असाही समज असावा. नाही तरी घड्याळ आणि पंजातली अनेक झाडं कमळाच्या पाकळ्यात विसावा घेतच आहेत!
Comments