किरण लोभे या तरुणाचं अवयवदान झालं. लातूर जिल्ह्यातलं पहिलं अवयवदान झालं. त्याची देशभर चर्चा झाली. पालकमंत्र्यांनीही अवयवदानाची घोषणा केली. पण अद्याप किरणच्या कुटुंबियाला कसलीही मदत मिळाली नाही. कॉंग्रेसचे नगरसेवक गौरव काथवटे यांनी सगळ्या नगरसेवकांचं एक महिन्याचं मानधन लोभे कुटुंबियाला देण्याची घोषणा केली होती. त्याचा काहीच उपयोग झाला नाही. लातुरच्या सरकारी दवाखान्यात किरणचे होर्डींग लागले आहे. लातुरकरांना तरी त्याची दया येते का हा प्रश्न चर्चेत आहे.
Comments