या छायाचित्रात साई बंधार्यात आलेले पाणी दिसते. १४ ऑक्टोबर २०१६ चे हे छायाचित्र आहे. एक महिला पाण्याने भरलेल्या बंधार्याला वंदन करते आहे. २०१६ नंतर पाण्याला अशा पद्धतीनं वंदन करण्याची संधीच मिळाली नाही. आज मांजरा धरणात काहीफार पाणी आले आहे. धरणात पाण्याची मंद गतीने आवक सुरु आहे. वांजरखेडा, कारसा पोहरेगाव आणि वांगदरी बॅरेजेसमध्ये पाणी आले आहे. नागझरीची स्थिती बरी आहे. साई बंधार्यात मात्र काहीच नाही.
Comments