लातूर शहरात काही महिन्यांपूर्वी येवलेचा चहा आला. बसस्थानकासमोर धुमधडाक्यात सुरु झाला. बघता बघता त्याच्या अनेक शाखा सुरु झाल्या. येवलेला चहापाणी नावाच्या अशाच एका ग्रुपने आव्हान दिलं. शहरात अनेक ठिकाणी चहापाणीच्याही शाखा सुरु झाल्या. या चहा पाण्याच्या स्पर्धेला लातुरच्या एका तरुणानं टक्कर देत लातुरचा अमृततुल्य चहा शिवाजी चौकात सुरु केला. काही क्षण स्वत:साठी...लातुरचा चहा सर्वांसाठी असं स्लोगनही त्याच्या पाटीवर झळकतंय. मोठ्या नावाच्या चहा कंपन्यांची शाखा सुरु करणं भलतं कठीण आहे म्हणे. १२-१५ लाख तयार ठेवावे लागतात असं एका व्यावसायिकानं सांगितलं.
Comments