हे आहे महावितरणने ग्राहकांना न विचारता बसवलेलं वीज मीटर. इलेक्ट्रॉनिक आहे. जोरात पळतं म्हणून लातुरात आंदोलनही उभा राहिलं. पूर्वी साधी मॅग्नेटीक तत्वावर चालणारी मीटर्स होती. ती उलटी फिरवणार्या टोळ्याही होत्या. आता हे शक्य नाही आणि या मीटर्सशी छेडछाड केल्यास ती अधिक वेगाने धावतील असा इशारा मीटर्सवर छापण्यात आला आहे. छेडछाड केल्यास अधिक वेगाने धावतात की नाही हे माहित नाही. पण छापलेल्या सुचनेमुळं त्याच्याशी छेडछाड करायला कुणी धजावत नाही.
Comments