हस्यसम्राट ‘चला हवा येऊ दया’ फेम, अभिनेते भारत गणेशपुरे हे उस्मानाबाद येथे एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी लातुरच्या बार्शी रोडवरील डॉ. चावरे हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली. ‘चला हवा येऊ दया’ या मराठी वाहिनीवरील कॉमेडी शो सारखे कार्यक्रम, मराठी चित्रपट यामध्ये आपल्या विशिष्ट संवाद कौशल्याच्या माध्यमातून मराठी माणसाच्या चेहऱ्यावर हास्य कायम ठेवले. भारत गणेशपुरे हे उस्मानाबाद येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असता लातूर येथील प्रसिद्ध दंततज्ञ डॉ. चेतन चावरे यांच्या बार्शी रोडवरील हॉस्पिटलमध्ये दंतरोग निदानासाठी मुंबई, पुणे या उपनगरासारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे, अगदी माफक दरात तपासणी व उपचार होतात हे माहीत झाल्यानंतर त्यांनी डॉ चावरे हॉस्पिटला भेट देऊन उपचार घेतला. महागाईच्या युगामध्ये अगदी कमी खर्चामध्ये सेवा देत सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या डॉ. चावरे यांनी केलेल्या उपचाराबद्दल समाधान व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी डॉ. स्वप्ना चावरे, डॉ. स्मिता चावरे, स्वाती चावरे, सायली मगर, सुमित कांबळे, मनीष सायगावकर, डॉ. राहूल कुलकर्णी, आकाश बनसोडे यांच्यासह हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.
Comments