लातुरच्या अशोक हॉटेल चौकात जुने विसावा विश्रामगृह होते. नंतर त्या ठिकाणी आरटीओचं कार्यालय काही काळ चाललं. आता हा सगळा परिसर उजाड आणि भग्न झाला आहे. या विश्रामगृहाच्या पाठभिंतीला कुणीतरी मोठे भगदाड पाडले आहे. यातून एक माणूस आरामात येऊ-जाऊ शकतो. कशासाठी हे भगदाड? कुणी पाडले? या भगदाडाचा उपयोग काय केला जातो? हा परिसर ज्यांना वर्ग करण्यात आला आहे त्यांनी त्याची निगा ठेवायला नको का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.
Comments