लातुरच्या क्रीडा संकुलावर संभाजीराव पाटील निलंगेकर पालकमंत्री असताना दिडशे फुटी खांब उभारण्यात आला. त्यावर तिरंगा फडकवण्यात आला. आता फक्त खांब उभा आहे. तिरंगा मात्र अनेक दिवसांपासून गायब आहे. या ठिकाणी सातत्याने असणार्या मंडळींकडे चौकशी केली असता हा तिरंगा उंचावर असल्याने हवेचा वेग मोठा असतो. त्यामुळे तिरंगा फाटतो, त्यामुळे तो उतरवण्यात आला असं ते सांगतात. हा अनुभव पाठीशी असतानाही असाच उंच तिरंगा निलंग्यातही फडकवला जाणार आहे!
Comments