मागच्या अनेक महिन्यांपासून ‘आपण सर्व’ची टीम सार्वजनिक ठिकाणे, स्मशानभूमी, सरकारी कार्यालये स्वच्छ करीत आहेत. काल त्यांनी तहसील कार्यालयाचा परिसर स्वच्छ केला. अशा दहा पाच टीम कामाला लागल्या तर मनपाचे काम हलके होणार आहे. या टीमला बक्षीस द्यायला हवं. मनपाने जप्त केलेल्या रकमा, दंडाच्या रकमा बक्षिसासाठी वापरायला हरकत नाही!
Comments