लातूर शहरातील चौक आणि रस्ते दुभाजक सुशोभित करण्यासाठी विविध व्यावसायिकांना देण्यात आले आहेत. याच पद्धतीने जीन्स, टी शर्ट बनवणार्या टायझर कंपनीला गांधी चौक सुशोभिकरणासाठी देण्यात आला आहे. या कंपनीच्या लातुरातील एजन्सीने गांधी पुतळ्याच्या गोल कठड्याला पोस्टर्स लावली. आता गांधीजींच्या पुढ्यात त्यांच्यापेक्षा अधिक मोठी Tyzer अशी लाकडी अक्षरे लावली आहेत. या मोठ्या अक्षरांमुळे या चौकाचे नाव गांधी चौक ऐवजी टायझर चौक असे प्रचलित होण्याची शक्यता आहे!
महात्मा गांधींनी आयुष्यभर पंचा वापरला आणि लातुरात त्यांना रोजच टी शर्ट आणि जीन्स बनवणार्या कंपनीची जाहिरात पाहणं नशिबी आलं!
Comments