HOME   फोटो फिचर

पुन्हा कोलमडली अशोक हॉटेल चौकातली सिग्नल यंत्रणा.....

पुन्हा कोलमडली अशोक हॉटेल चौकातली सिग्नल यंत्रणा.....

अलिकडच्या काळात लातूर शहरातील सिग्नल यंत्रणेचे जरा बरे चालले होते. अनेक महिने बंद असलेली मिनी मार्केटची यंत्रणा कशीबशी सुरु झाली. त्यानंतर दयानंद गेट, हनुमान चौक आणि सुभाष चौकात नवी यंत्रणा बसवण्यात आली. काही दिवसांपूर्वी सुभाष चौकातली यंत्रणा बंद पडली. आता अशोक हॉटेल चौक अर्थात नव्या लोकमान्य टिळक चौकातली यंत्रणा आठ दिवसांपासून बंद पडली आहे. ही यंत्रणा सांभाळणार्‍या गुत्तेदाराचे पैसे न मिळाल्याने त्याने सिग्नल यंत्रणेचे किट काढून नेले अशी माहिती या ठिकाणी ड्युटीवर असणार्‍या ट्राफीक पोलिसाने सांगितले. याबद्दल मनपातील संबंधिताकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण चौकशी करुन सांगतो असं उत्तर मिळालं. पण त्या व्यक्तीची चौकशी अजून संपलेली नाही. सिग्नल चालू असतील तरच पोलिस नीटपणे नियंत्रण करु शकतो. नसेल तर नियंत्रण कठीण जाते.

Comments

Top