HOME   फोटो फिचर

आता हे भंगार चोरीला कधी जाणार?.......

आता हे भंगार चोरीला कधी जाणार?.......

महानगरपालिकेचे कर्मचारी सातत्याने वेगवेगळ्या मोहिमात साहित्य जप्त करीत असतात. यात लाकडी आणि लोखंडी साहित्य मोठ्या प्रमाणावर असते. हे भंगार टाऊन हॉलच्या मैदानावर कोंडवाड्याच्या बाजुला साठवून ठेवलेले असते. हे साहित्य सतत चोरीला जात असते. मागच्या वर्षी भंगार चोरीचे प्रकरण चांगलेच गाजले होते. आताही मोठ्या प्रमाणावर असे भंगार साठवून ठेवण्यात आले आहे. परवा कोंडवाड्यात प्लास्टीकचा कचरा जाळण्यात आला. नंतर तिजोरी चोरीला गेली आता या भंगारवर चोरट्यांचा डोळा नक्कीच असणार. या भंगाराचा लिलाव किंवा विक्री केली तर चोरीला गेलेल्या तिजोरीचे पैसे रिकव्हर होऊ शकतात. किंवा भंगार विकून आलेल्या पैशातून चांगली तिजोरी खरेदी करता येईल. तिजोरीत ठेवायला पैसे मिळतील की नाही ते नंतर पाहता येईल!

Comments

Top