गांधी चौकात लातूर महानगरपालिकेने स्थानिक संस्था कराबाबत आवाहन करणारे डिजिटल पोस्टर लावले आहे. या पोस्टरवर गांधी मार्केटमध्ये नव्याने झालेल्या लातूर ट्रेड सेंटरची जाहिरात लावण्यात आली आहे. या ट्रेड सेंटरमध्ये जवळपास सगळीच दुकाने मोबाईल अक्सेसरीज आणि दुरुस्तीची आहेत. ही बाब सगळेच पाहतात. पण मनपाला दिसत नाही. अतिक्रमण निर्मूलन विभागालाही याचे छायाचित्र दाखवण्यात आले पण उपयोग झाला नाही! परवाच या ठिकाणचे अनधिकृत डिजिटल पोस्टर्स हटवण्यात आले होते. पण तेव्हाही हा जाहिरात घोटाळा त्यांना दिसला नव्हता.
Comments